Wednesday 13 April 2016

फार झाले

फार झाले
(गझल)

●●●
चाखुन फार झाले शब्द तुझ्या ओठीचे

काढून फार झाले अर्थ त्या मिठीचे



नाव ना सुचले तुज आपल्या नात्याला
वापरून फार झाले शब्द मज गाठीचे


गायले मी तुजसाठी प्रेमाचे तराणे
काय झाले आता गोड त्या भेटीचे


खंबीर होती तु हरवेळी मजसाठी
मग कारण काय होते कुठल्या भीतीचे


मजसाठी तु झुगारले बंध वेळोवेळी
मग पाळले नियम तु कोणत्या रितीचे

 - रघुनाथ सोनटक्के
●●●

No comments:

Post a Comment