Monday, 21 March 2016

पथीक


पथीक (गझल)

फुले आहेत गोड म्हणून सहज त्यांना तोडु नकोस
पथ आहे काटेरी म्हणून अर्ध्यावरती सोडू नकोस

खुशाल हसू देत जनास दुःखावरी अपुल्या
कुणामुळे तु दुःख सारे मनातल्या मनात गिळू नकोस

वेगळ्या वाटेचा तु पथीक सहज अडवील कुणी वाट तुझी
संकटांचा साचेल ढीग पुढयात तरी मनाने खचू नकोस

झालीच नाही कुणा मदत तुझी मागे कधी आेढू नकोस
पथ आहे काटेरी म्हणून अर्ध्यावरती सोडू नकोस

चालत रहा पुढेपुढे नकोस करू लक्ष विचलीत
कुणी हिणवेल कुणी रडवेल भिक त्यांना घालू नकोस

होतील चुका तुझ्याही हजार शल्य कधी मनांत ठेऊ नकोस
चुकल्यांना वाट दाखव एकटं कुणास सोडु नकोस

पथ आहे काटेरी म्हणून अर्ध्यावरती सोडू नकोस


 रघुनाथ सोनटक्के
दि. २६ मार्च२०१५